नंदुरबार : ट्रॅक्टरच्या धडकेत बालकाचा मृत्यू | पुढारी

नंदुरबार : ट्रॅक्टरच्या धडकेत बालकाचा मृत्यू

नंदुरबार ; पुढारी वृत्तसेवा : तळोदा तालुक्यातील तलावडी शिवारात ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे ट्रॅक्‍टरच्या धडकेत बालकाचा मृत्यू झाला. ट्रॅक्‍टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तलावडी शिवारात शेतात ट्रॅक्टर चालक योगेश पाडवी हा एम. एच. 39 एबी 7802 क्रमांकाच्या ट्रॅक्टर वरील रोटर मशीनच्या सहाय्याने काम करीत होता. मात्र रोटर मशीनचा धक्का लागल्याने दिनेश प्रभू पाडवी (‌‌वय 10) या बालकास गंभीर दुखापत झाली. दरम्‍यान त्‍याला रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्देवाने उपचारादरम्यान या बालकाचा मृत्यू झाला.

याबाबत सुमनबाई पाडवी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तळोदा तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक योगेश पाडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार भील करीत आहेत.

Back to top button