APMC Election : चांदवड कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत ‘इतके’ टक्के मतदान | पुढारी

APMC Election : चांदवड कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 'इतके' टक्के मतदान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण २ हजार २७६ मतदारांपैकी १७९८ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केल्याने ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथील भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मतदान घेतले जात आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजता मतदान घेण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विकास पॅनल व राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना गट यांच्या महाविकास आघाडीच्या लोकमान्य परिवर्तन पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांनी मतदान केंद्राच्या आवारात मोठी गर्दी केली आहे. यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उमेदवार हात जोडून विंनती करताना दिसत होते.

हेही वाचा : 

ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांना पीएमश्री योजनेचे बळ

मोटेवाडी तलावाने तळ गाठला; चासकमान प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी

Back to top button