मोटेवाडी तलावाने तळ गाठला; चासकमान प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी | पुढारी

मोटेवाडी तलावाने तळ गाठला; चासकमान प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी

निमोणे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील मोटेवाडी तलावाने तळ गाठल्याने चासकमान प्रकल्पातून पाणी सोडण्याची
मागणी होत आहे. चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी व दुर्गेवस्ती आदी परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोटेवाडी पाझर तलाव हा एकमेव हक्काचा स्रोत आहे. चासकमान आवर्तन काळात तलाव भरून घेतल्यानंतर तीन महिने या परिसरातील पाण्याचा प्रश्न निकाली निघतो.

सद्य:स्थितीत तलावाने तळ गाठल्यामुळे तातडीने चासकमानचे पाणी मिळाले नाही तर या परिसरातील फळबागा, ऊस, कांदा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अतिशय बिकट होईल, पाळीव जनावरांबरोबरच मेंढपाळ मंडळींनादेखील पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा तातडीने विचार करून चालू आवर्तनात मोटेवाडी पाझर तलावामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.

Back to top button