ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांना पीएमश्री योजनेचे बळ | पुढारी

ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांना पीएमश्री योजनेचे बळ

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या पीएमश्री शाळा योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातील २०१ शाळांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यातून प्राथमिक चाचणी होऊन अंतिम निवडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १४ शाळा पात्र ठरल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.

येत्या काळात या ‘शाळांचा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकास केला जाणार असून, दर्जात्मक आणि गुणात्मक शिक्षणासह शाळांच्या भौतिक विकासावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयातील  निवड झालेल्या शाळांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे.

राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पीएम श्री योजना राबली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा मूलभूत गुणवत्तापूर्ण विकास करण्याबरोबरच त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवून उच्च दर्जाचा शैक्षणिक विकास साधने, अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देणे हे या योजेनचे उद्दिष्ट आहे. या योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणेसाठी काम करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ शाळा, महानगरपालिकेच्या ६ शाळा, नगरपालिका २, शहापुर नगरपंचायत १ अशा प्रकारे शाळाची निवड करण्यात आली आहे.

इमारत दुरुस्ती, स्मार्ट वर्गखोल्या, मुली, मुल तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृह, संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब, डिजिटल ग्रंथालये इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरिकरण करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे

Back to top button