पिंपळनेर : कोंडाईबारी वनविभागाच्या विरोधात भोनगावच्या शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको | पुढारी

पिंपळनेर : कोंडाईबारी वनविभागाच्या विरोधात भोनगावच्या शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रस्त्यावर वन्य प्राणी बिबटया, तरस अशा वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे भोनगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

दहिवेल परिसरातील भोनगाव, कालदर, किरवाडे, आमोडे आदी परिसरातील शेतकऱ्यांना रात्री पिंकाना पाणी भरण्यासाठी जावे लागते.  गेल्या वर्षभरापासून बिबट्या व तरस यांचा वावर असल्यामुळे रात्री अपरात्री बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी बांधव घाबरले आहेत. तरी कोंडाईबारी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सविता सोनवणे, वनपाल नीता मस्के यांना वारंवार निवेदन देऊनही यांनी निवेदनाची दखल घेतली नाही. तसेच संबंधित अधिका-यांनी निवेदनाकडे जाणीवपूर्वक अत्यंत दुर्लक्ष आहे. अशी भावना व्यक्त करत ही बाब लक्षात ठेवून भोनगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून संतप्त आंदोलन केले. याप्रसंगी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना माहिती मिळताच ते आंदोलनाच्या घटनास्थळी हजर झाले व शेतकऱ्यांची समजून काढून शांततापूर्वक आंदोलन मागे घेण्यात यश आले. आंदोलनात सहभागी भोनगावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, आमोडे, कालदर बोदगाव, चिंचपाडा, किरवाडे गावाचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button