नाशिक : कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज अवैध | पुढारी

नाशिक : कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज अवैध

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अर्ज छाननीत २ अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चिंतामण भोये यांनी दिली.

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकूण १३२ अर्ज दाखल झाले आहेत. यात गटनिहाय एकूण मतदान, सदस्य संख्या व दाखल उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे सोसायटी गट एकूण मतदान – ४९९, एकूण अर्ज दाखल – ७३, सर्वसाधारण – ४७, महिला राखीव – ९, इतर मागासवर्ग – ११, वि.जा. किंवा भ.ज. – ६, ग्रामपंचायत गट – एकूण मतदान – ७७३, एकूण अर्ज दाखल – ६४, सर्वसाधारण – २५, आर्थिक दुर्बल – ५, अ.जा. किंवा अ.ज. – १४, व्यापारी गट – सदस्य संख्या – २, एकूण मतदान – ४०६, एकूण अर्ज दाखल ७, हमाल मापारी गट – सदस्य संख्या-१, एकूण मतदान – ११२, एकूण अर्ज दाखल – ८.

गुरुवारी (दि. 6) बाजार समिती कार्यालयात झालेल्या छाननीत सोसायटी महिला राखीव गटातील रत्ना प्रकाश आहेर व ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून बाबूराव झिप्रू गावित असे दोन उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत. दि २१ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून सत्ताधारी गटाचे उमेदवार निश्चित झाले असून मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आदिवासी समन्वय समितीचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र सत्ताधारी गटाचे नेते धनंजय पवार व आमदार नितीन पवार, परिवर्तन पॅनलचे रवींद्र देवरे व परिवर्तन विकास आघाडीचे माजी आमदार जे. पी. गावित व किसान सभा जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांच्या तीन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. माघारी दरम्यान काय नाटकीय घडामोडी होतात, याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

Back to top button