स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन | पुढारी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा सोमवारी (दि.२७) दिल्लीतील संसदेच्या आवारात राज्यातील भाजप-शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन करत निषेध केला.

‘बंद करो-बंद करो, वीर सावरकरजी का अपमान बंद करो’ अशा आशयाचे फलक झळकावत खासदारांनी राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात घोषणाबाजी केली. खासदारांच्या या घोषणाबाजीमुळे काही काळ संसद आवारातील वातावरण ढवळून निघाले होते. यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी दिला.

काॅंग्रेसचे राहुल गांधी यांनी काही दिवंसापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील भाजप-सेनेच्या खासदारांनी संसदेच्या आवारातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, पूनम महाजन, धनंजय महाडिक, गोपाळ शेट्टी, सुधाकर शृंगारे, अशोक नेहते, अनिल बोंडे, साक्षी महाराज आदी खासदार उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button