Beetroot Paratha Recipe : मऊ झालेले बीट फेकून देऊ नका, असे करा चविष्ट पराठे | पुढारी

Beetroot Paratha Recipe : मऊ झालेले बीट फेकून देऊ नका, असे करा चविष्ट पराठे

पुढारी ऑनलाईन डेस्क – पोषकतत्वांनी भरपूर बीट रोजच्या जेवणात असावे, असे म्हटले जाते. पण, बीटच्या एक किंवा दोन स्लाईसच आपण खातो. कधी -कधी बीट वाया जाते. तर कधी ते मऊ झाल्यानंतर आपण फेकून देतो. पण तसे न करता ज्याला बीट आवडत नाही, (Beetroot Paratha Recipe) तो देखील हा टेस्टी पराठा नक्की खाणार. होय, बीटापासून चवदार पराठा बनवायला शिका. मुलांना गुलाबी रंगाचा पराठा नाश्त्यालादेखील देऊ शकता. (Beetroot Paratha Recipe)

बीटापासून पराठा कसा बनवायचा जाणून घेऊया-

साहित्य –

गहू / मैदा आटा

२ बीटरूट

लाल तिखट-१ चमचा

हळद-१ चमचा

जिरा पावडर – १ चमचा

मीठ- चवीनुसार

साखर-चवीनुसार

तूप

तेल

पाणी

तीळ

कृती-

बीटाच्या साली सोलून घ्याव्या. बीट धुवून घेऊन त्याचे छोटे छोट तुकडे करून घ्यावेत. आता एका भांड्यात २ चमचे तूप घालावे. त्यात हे तुकडे टाकून तळून घ्यावेत. तुकडे नरम होऊपर्यंत शिजू द्यावेत. गॅस बंद करून भाड्यातून बीाचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्य़ात काढून घ्यावेत. तुकडे गार होऊ द्यावेत. मिक्सरवर बीटाचे बारीक मिश्रण तयार करावे. हवे असल्यास थोडे पाणी घालावे. तुम्ही बीट खिसणीवर खिसूनही घेऊ शकता.

आता एका मोठ्या बाऊलमध्ये गहू आटा, मीठ, साखर, लाल तिखट, जिरा पावडर, हळद पावडर आणि बीटाचे मिश्रण घालून मळून घ्यावे.

जितकं मळता येईल, तितके विना पाण्य़ाचे पीठ मळून घ्यावे. त्यानंतर १५ मिनिट तसेच ठेवून द्यावे. काही वेळाने बीटाला पाणी आपोआप सुटल्याने पीठाला अधिक पाण्याची गरज भासत नाही. समजा पीठामध्ये पाणी जास्त झाल्यास तुम्ही त्यामध्ये मैदा घालू शकता. अथवा पाणी कमी पडल्यास पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घेऊ शकता.

बीट कच्चे अल्याने पोळपाटाला चिकटते. त्यामुळे हलक्या हाताने लाटावे लागेल. आता छोटे छोटो गोळे घेऊन चपाती लाटतो तसे हे गोळे लाटून घ्या. जास्त दाब देऊ नये नाही तर पीठ पोठपाटाला चिकटते. गोलाकार पराठे बनवून तव्यावर शेकून घ्या. दोन्ही बाजूने तेल लावून चांगले शेकून घ्यावे. तुम्ही पराठे कुरकुरीत देखील करू शकता.गरम गरम बीटाचे पराठे घेऊन त्यावर तूप टाकून लोणच्यासोबत खायला घ्यावे.

Back to top button