नाशिक : वाहन चालवण्यासाठी 94 जण झाले पास | पुढारी

नाशिक : वाहन चालवण्यासाठी 94 जण झाले पास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चालकपदाच्या 15 रिक्त जागांसाठी मैदानी चाचणीनंतर निवड झालेल्या 196 पैकी 140 उमेदवारांनी वाहन चालवण्याच्या 50 गुणांच्या कौशल्य चाचणीत 94 उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, लेखी परीक्षेकडे आता सर्वांचे लक्ष आहे. राज्यासह नाशिक ग्रामीण पोलिस दलात रिक्तपदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू असून, चालकपदाच्या जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळून मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यात एक हजार 22 उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले होते. त्यातील 196 उमेदवारांची पुढील चाचणीसाठी निवड झाली. त्यानुसार 23 आणि 24 जानेवारी रोजी वाहन चालविण्याच्या परीक्षेसाठी उमेदवारांना वेळा देण्यात आल्या होत्या. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील मैदानात विविध प्रकारांत जड व हलके वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेण्यात आली. या चाचणीची गुणतालिका जाहीर झाली असून, लवकरच प्रवर्गनिहाय या चाचणीचा कटऑफ जाहीर होणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करीत लेखी परीक्षेबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. कौशल्य चाचणीत हलके व जीप प्रकारातील वाहने चालवण्याची परीक्षा घेण्यात आली.

हेही वाचा:

Back to top button