जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, परदेश प्रवास करण्यास कोर्टाची परवानगी | पुढारी

जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, परदेश प्रवास करण्यास कोर्टाची परवानगी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित हवाला प्रकरणात अडकलेली सिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला परदेशात जाण्यास पटियाला हाऊस न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. दुबई येथे २७ ते ३० जानेवारी या कालावधीत पेप्सिको कंपनीची परिषद होत असून या परिषदेला हजर राहण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती जॅकलिनने केली होती.

जॅकलिनच्या परदेश प्रवासाबाबतच्या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती शैलेंद्र मलिक यांनी सक्तवसुली संचलनालयाकडून मत मागविले होते. सुकेशच्या दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी उकळण्याच्या तसेच हवाला प्रकरणात जॅकलिन सामील असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे.

गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने जॅकलिनला नियमित जामीन मंजूर केला होता. जॅकलिनचा पेप्सिको कंपनीबरोबर करार असून ती जर दुबईतील परिषदेला हजर राहिली नाही. तर, पेप्सिको कंपनी तिच्यावर खटला दाखल करू शकते, असा युक्तिवाद गत सुनावणीवेळी जॅकलिनच्या वकिलांनी केला होता.

हेही वाचा : 

Back to top button