Nashik : धनादेश न वटल्याप्रकरणी महिलेस कारावासासह दंड | पुढारी

Nashik : धनादेश न वटल्याप्रकरणी महिलेस कारावासासह दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उसनवार घेतलेले पैसे परतफेड न करता दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने न्यायालयाने महिलेस आठ लाख १५ हजार रुपयांचा दंड व एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. स्विटी कमलेश शिंगाने ऊर्फ स्विटी शरद सासे असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे.

बांधकाम व्यावसायिक अमोल शशिकांत अहिरराव यांनी केनकॉप मार्केटिंग कंपनीच्या संचालिका स्विटी यांना चार लाख ८५ हजार रुपये व्यवसायासाठी उसने दिले होते. स्विटी यांनी अहिरराव यांना पैसे परत देण्यासाठी धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे अहिरराव यांनी २०१८ मध्ये न्यायालयात धनादेश न वटल्याप्रकरणी केस दाखल केली. या प्रकरणात स्विटी यांनी पैसे देण्यास विलंब केल्याचे आढळून आले. बिनव्याजी पैसे घेऊन त्याचा उपभोग घेतल्यानंतरही स्विटी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले.

त्यामुळे न्यायाधीश जी. एच. पाटील यांनी स्विटीला दंड म्हणून आठ लाख १५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले तसेच महिनाभर साध्या कारावासाची शिक्षा सुनावलीआहे. या खटल्यात अहिरराव यांच्या वतीने ॲड. राहुल वसंत पाटील-काकड यांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा :

Back to top button