नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन | पुढारी

नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन

देवळाली कॅम्प (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब व दिव्यांग बांधवांचे कैवारी असलेले बच्चू कडू यांच्यावर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

जुने बस स्थानक येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जेकब पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली आमदार राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राणा यांच्‍या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे, शहराध्यक्ष चंद्रकांत वालझाडे भगूर, शहराध्यक्ष कल्पेश करंजकर, सरचिटणीस सुभाष निकाळजे, जितू देवकर, अशोक करंजकर, अशोक सोनवणे, चंद्रकांत वालझाडे, शब्बीर आली नुरी आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

हेही वाचा;

Back to top button