जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी | पुढारी

जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका डॉक्टरला काही तरुणींनी हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्यानंतर व्हिडिओ बनवत ते व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी ८ जणांविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामानंदनगर परीसरातील ४० वर्षीय डॉक्टरांना अडकविण्यासाठी काही तरुण-तरुणींनी कट रचला. यातील एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर देत त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले. या व्हिडीओ चित्रीकरणाच्या बळावर चेतन व हिरामण नावाच्या दोघांनी डॉक्टरला मारहाण करत व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रदीप व संदीप या दोघांच्या मदतीने ७ लाख खंडणीची मागणी केली.  ७ लाख रुपये दिले तरच प्रकरण मिटवण्याचे सांगून अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये चार महिला व चार पुरुष अशा एकूण ८ जणांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button