Nashik : माडसांगवीत 357 क्विंटल विनापरवाना धान्यसाठा सील | पुढारी

Nashik : माडसांगवीत 357 क्विंटल विनापरवाना धान्यसाठा सील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मांडसांगवीला गोदामातील 357 क्विंटल विनापरवाना धान्यसाठा तहसीलदार अनिल दौंडे यांनी सील करत पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. मांडसांगवीत गोदामात मोठ्या प्रमाणात धान्याची साठवणूक केल्याची बाब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार नरसीकर यांनी दौंडे यांच्यामार्फत गोदामाची तपासणी केली.

या तपासणीत प्राथमिक माहितीनुसार देशमुख नामक व्यक्तीचे हे गोदाम आहे. गोदामात 175 क्विंटल गहू, 182 क्विंटल तांदूळ असा 357 क्विंटल धान्याचा साठा आढळला. धान्याच्या पोत्यांवर महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनाचा उल्लेख आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3 व 7 नुसार गोदाम मालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button