नाशिक : वेगवेगळ्या अपघातांतील तीन जखमींचा मृत्यू | पुढारी

नाशिक : वेगवेगळ्या अपघातांतील तीन जखमींचा मृत्यू

नाशिक : वेगवेगळ्या अपघातांतील तीन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीला रामदास क्षीरसागर (50, रा. उगाव, ता. निफाड) यांचा आडगाव शिवारात अपघात झाला होता. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. द्वारका परिसरातील अपघातात जखमी झालेल्या जैनुलाबेद्दिन हुसैनी नामपूरवाला (36, रा. गुरुद्वारा, मालेगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मंगलाबाई हरिश्चंद्र शिंदे (57, रा. म्हसरूळ) या गडकरी चौकातील रिक्षा अपघातात जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

Back to top button