Nashik : भारीच ! जुळ्या बहिणींचे गुणही सेम टू सेम ; शिवाय विद्यालयात आल्या प्रथम | पुढारी

Nashik : भारीच ! जुळ्या बहिणींचे गुणही सेम टू सेम ; शिवाय विद्यालयात आल्या प्रथम

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील देवपुरपाडे येथील ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल लागला. त्यात लक्ष वेधून घेतले ते मन्साराम आढाव या मजुराच्या जुळ्या मुलींनी. काजल आणि कोमल या बहिणींनी सारखेच 90.20 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. जुळ्या बहिणींचे सेम टू सेम गुण कौतुकाचा विषय ठरला आहे.

काजल आणि कोमल या अतिशय हुशार मुली असून, कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवत त्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत आहेत. दहावींच्या परिक्षेत दोघींनी 90.20 टक्के गुण मिळवत कुणीच कुणापेक्षा कमी नाही, हे दाखवून दिले. त्याखालोखाल दुसरा क्रमांक कावेरी दादाजी बागूल (88.20टक्के) हिने पटकावला असून, 87.60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांकावर भुषण रंगनाथ अहिरे आणि राज कौतिक ठाकरे या दोघांनी नाव कोरले. सोनाली रवींद्र अहिरे (87.20 टक्के) हिने चतुर्थ, तर यश दिलीप सोनवणे आणि अंकीता संजय सूर्यवंशी (84.80 टक्के) या दोघांनीही पाचवा क्रमांक प्राप्त केला. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अभिमन अहिरे, ग्रामपंचायत सदस्य अजय अहिरे यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा :

Back to top button