धुळे : माहेरहून परतताना माय लेकांनी घेतली नदीत उडी; गिधाडेच्या तापी नदीजवळील घटना | पुढारी

धुळे : माहेरहून परतताना माय लेकांनी घेतली नदीत उडी; गिधाडेच्या तापी नदीजवळील घटना

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील गिधाडे शिवारातील तापी नदीपात्रात उडी घेऊन माय लेकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली. घटनास्थळी बॅग, साडी आणि वह्या मिळून आल्या आहेत. या वहीवर लिहिलेल्या नावामुळे महिला आणि तिच्या मुलाची ओळख पटली आहे. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत या दोघांचा शोध घेणे सुरू होते.

शिरपूर तालुक्यातील गिधाडे नजिक तापी नदीच्या पात्रात एका महिलेने दहा वर्षाच्या मुला सोबत नदीच्या पात्रात उडी घेतली. ही घटना एका व्यक्तीच्या निदर्शनास आली. त्यामुळे या व्यक्तीने आरडाओरड करून नदीच्या पात्राकडे धाव घेतली. यावेळी घटनास्थळी एक बॅग आढळून आली. या बॅगमध्ये असलेल्या वहीमध्ये तेजेंद्र रवींद्र सिंग राजपूत असे नाव आणि एक मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. तसेच यावेळी एक साडी देखील आढळून आली.

वहीवर लिहिलेल्या क्रमांकावरून साधला संपर्क

वहीवर लिहिलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता सदर महिला ही शिरपूर तालुक्यातील वाडी येथील असल्याचे समजले. योगिताबाई रवींद्र सिंग गिरासे (वय 30) असे महीलेचे नाव, तर मुलाचे नाव राजेंद्र रवींद्र सिंग राजपूत (वय १० वर्षे असल्याचे निदर्शनास आले आहे.

माहेरहून येताना माय लेकांनी घेतली नदीत उडी

मुलासोबत माहेरी गेलेल्या योगिताबाई गिरासे या त्यांच्या सासरी म्हणजेच शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे येण्यासाठी निघाल्या. मात्र दुपारी या दोघांनी तापी नदीपात्रात उडी घेतल्याचा प्रकार निदर्शनास आला. या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसह वाडी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गिधाडे नजीकच्या तापी नदीच्या पुलावर घडलेली घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. नदीच्या पात्रात पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने या दोन्ही मायलेकांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

हेही वाचा

Back to top button