नगर : वि. का. सेवा सोसायटीच्या कार्यालयात राडा करणाऱ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

नगर : वि. का. सेवा सोसायटीच्या कार्यालयात राडा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात राडा करत सचिव व कर्मचाऱ्यांना शिविगाळ दमदाटी करून कार्यालयाला कुलूप लावल्या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात एकाजणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग आनंदा कडूस (रा.सारोळा कासार,ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, सोसायटीचे सचिव महादेव अंबादास ठाणगे (रा.हिवरे बाजार, ता.नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

सचिव ठाणगे व कर्मचारी सोसायटीच्या कार्यालयात काम करत बसलेले असताना आरोपी जयसिंग कडूस हा कार्यालयात आला व त्याने सचिवांकडे चहाच्या बिलाच्या पैशांची मागणी केली. त्यावेळी सचिव ठाणगे यांनी तुमचे सर्व पैसे दिलेले आहेत. असे सांगितले असता त्याचा राग येऊन आरोपी कडूस याने आरडाओरडा सुरु केला. कार्यालयातील रजिस्टर फेकून दिले. सचिव व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत सचिव ठाणगे यांना तुला बघून घेतो, अशी दमबाजी केली. त्यानंतर सोसायटीच्या कार्यालयाला बाहेरून कुलूप लावुन घेतले.

दाऊदची धमकी देत ७५ वर्षीय व्यावसायिकाचा ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार

या प्रकारानंतर सचिव ठाणगे यांनी मंगळवारी (दि.१४) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी जयसिंग कडूस याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४२७,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button