Radhika Apte : राधिकाच्या ग्रीन बिकिनीनं वाढवलं तापमान | पुढारी

Radhika Apte : राधिकाच्या ग्रीन बिकिनीनं वाढवलं तापमान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte)चित्रपटांव्यतिरिक्त अनेकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. सध्या तिच्या आणखी एका हॉट बिकिनी फोटोने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte)ने तिच्या इन्स्टाग्रामवर ग्रीन रंगाच्या बिकिनीत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राधिका एका बीचवर एकटीच खाली जमिनीकडे एकटक पाहताना दिसतेय. तर तिचा एका हात जमिनीवर तर दुसऱ्या एका हातात कागदावर काहीतरी लिहिल्याचे दिसत आहे. याशिवाय तिच्या आजूबाजूला मोठी छत्री, चप्पल, पर्स आणि इतर साहित्य दिसत आहे. या फोटोतील खास म्हणजे, समुद्राच्या बीचवर एक कापड्यावर बिकिनीत बसलेली राधिका दिसतेय. तर यावेळी तिने आपल्या केसांवर हटके अंदाजात चष्मा परिधान केला आहे. राधिका या लूकमध्ये खूपच हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘New hobby 🖌’. असे लिहिले आहे. तर तिने #watercolor #beach 🐙. असे हॅसटॅगदेखील दिले आहेत. यावरून राधिका आपला छंद जोपासत एका बीचवर पेंटिग करत असताना दिसत आहे. परंतु, या फोटोत मात्र, तिने काढलेले चित्र किंवा पेंडिग स्पष्ट दिसत नाही. तर ती निवांत क्षणी आपला टाईम्स स्पेंट करताना दिसतेय. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने ‘हॉट’, ‘व्वाह’, ‘तू फार छान दिसतेस’, ‘सुपर ब्युटी फिटनेस’. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘beautiful’, ‘Now I know why today’s temperature is high🌹😂😂💥💥’, ‘Hey beautiful 🔥😍’, ‘Hot’, ‘Wowww’, ‘Amazing looks’ असे म्हटले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलं आहेत. याच दरम्यान एका सोशल मीडिया युजर्सने राधिकाला तिचे कपडे कोठे आहेत? असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

Back to top button