नाशिक : जेसीबीखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू | पुढारी

नाशिक : जेसीबीखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू

नाशिक (मनमाड) : खडीक्रशरसाठी डोंगरावरून दगड काढताना जेसीबीखाली सापडून चालक जागीच ठार झाल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या अनकवाडे येथे घडली. रोहित चव्हाण (35) असे या चालकाचे नाव आहे.

मनमाडपासून आठ किमी अंतरावर अनकवाडे शिवारात खडीक्रशरसाठी डोंगरावरून दगड काढण्यासाठी रोहित चव्हाण हा जेसीबी घेऊन डोंगरावर गेला होता. दगड काढत असताना एक दगड सरकल्याने रोहितचा जेसीबीवरून ताबा सुटला आणि जेसीबी सुमारे 100 फुटांवरून खाली कोसळला. यावेळी जेसीबी खाली सापडल्याने रोहितचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अनकवाडे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

Back to top button