Dhule : गुलाबराव काकुस्ते ‘ऊस भूषण’ पुरस्काराने सन्मानित, खा. शरद पवार यांच्या हस्ते गौरव | पुढारी

Dhule : गुलाबराव काकुस्ते 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मानित, खा. शरद पवार यांच्या हस्ते गौरव

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा 

साक्री तालुक्यातील कासारे येथील प्रगतशील शेतकरी तथा सेवानिवृत्त उपअभियंता गुलाबराव दशरथ काकूस्ते यांनी ऊसाचे हेक्टरी २७० टन विक्रमी उत्पादन घेतले होते. त्यांच्या या विक्रमी उत्पादनाची दखल घेत पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने त्यांना ‘ऊस भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यात सन २०२०-२१ या वर्षात मध्य विभागात पूर्व हंगामात प्रथम क्रमांकाने ऊस उत्पादन घेतल्याबद्दल प्रगतशील शेतकरी गुलाबराव दशरथ काकूस्ते यांचा कुटुंबासमवेत दि. ५ जून रोजी राज्यस्तरीय साखर परिषदेमध्ये सन्मान करण्यात आला. खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

प्रगतशील शेतकरी यांना पुरस्कार मिळाल्याने साक्री तालुक्याच्या नावलौकीत भर पडली असून तालुक्यातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले तर कासारे येथील सरपंच विशाल देसले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. गुलाबराव काकूस्ते हे कासारे येथील माजी सरपंच कै. दशरथ सदा काकूस्ते यांचे सुपुत्र तर संभाजी काकूस्ते व साक्री पं.स.चे माजी सदस्य प्रा. युवराज काकूस्ते यांचे बंधू तर कासारे येथील पोलीस पाटील दीपक काकूस्ते यांचे काका आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा :

Back to top button