दिंडोरी तालुक्यात डोक्यात हातोडी मारून एकाचा खून | पुढारी

दिंडोरी तालुक्यात डोक्यात हातोडी मारून एकाचा खून

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देहरेवाडी शिवारात पिंपळगाव येथील एका इसमाची डोक्यात हातोडी मारून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल राजाराम झेंडफळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, तालुक्यातील देहरेवाडी ते रासेगाव रस्ताच्याकडेला पिंपळगाव बसवंत येथील अनिल राजाराम झेंडफळे (वय ४३) या इसमाचा मृतदेह आढळला. यानंतर दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन पाठवण्यात आला. मयत इसमाच्या डोक्याच्या मागील बाजूस हातोंडी मारून त्यास जीवे ठार मारल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले.

याबाबत मयत इसमाचे भाऊ सुरेश राजाराम झेंडफळे यांनी याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button