क्षमा बिंदू हिच्या स्वत:शीच लग्न करण्याच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध | पुढारी

क्षमा बिंदू हिच्या स्वत:शीच लग्न करण्याच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध

बडोदा ; वृत्तसंस्था : गुजरातच्या बडोदा शहरातील 24 वर्षीय क्षमा बिंदू हिने स्वत:शीच लग्न करण्याच्या निर्णयाला आता विरोध होत आहे. यामुळे क्षमाच्या अडचणी वाढल्या आहेत.

बडोदा शहराच्या माजी उपमहापौर सुनीता शुक्ला म्हणाली की, क्षमाला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही. क्षमा मानसिकरित्या विक्षिप्त असून हिंदू आणि वैदिक शास्त्रानुसार देशात लग्नं केली जातात. क्षमाला लग्न करावयाचे असल्यास तिने हॉटेल बुक करावे; अथवा अन्य ठिकाणी जावे. सुनीता शुक्ला यांच्या इशार्‍यानंतर क्षमाचे लग्न लावून देण्यास कोणताही पुरोहित तयार नसल्याचे सांगण्यात आले.

क्षमा बिंदु

जगात कुठे कुठे ‘स्वत:शी लग्न!’

जपानमध्ये असे ‘सोलो वेडिंग’ करणार्‍यांची संख्या मोठी आहे. इटली, ऑस्ट्रेलिया, तैवान, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही हे चलन आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियातही पॅट्रिशिया क्रिस्टीन नावाच्या मुलीने स्वत:शी लग्न केले होते. पॅट्रिशियानेे लग्नपत्रिकाही छापल्या होत्या. अनेक बायका करणे म्हणजे पॉलिगॅमी, तसेच स्वत:शी लग्न करणे म्हणजे सोलोगॅमी होय! जपानमध्ये ‘सेरेका’ नावाची कंपनी अशा विवाहांसाठी सेवा पुरविण्याचे काम करते. अमेरिकेत ‘सिंगल वुमन’ मोठ्या संख्येने आहेत आणि त्यातील बर्‍याच जणी स्वत:शी लग्न करतात.

Back to top button