नाशिक : महिला आरक्षण सोडत; मातब्बरांना दे धक्का | पुढारी

नाशिक : महिला आरक्षण सोडत; मातब्बरांना दे धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिला आरक्षण सोडतीनंतर महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महिला आरक्षणामुळे 20 पेक्षा जास्त मातब्बर माजी नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. हक्काच्या जागेवर महिला आरक्षण पडल्याने पुरुष मातब्बरांना अन्य जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. अथवा कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही मातब्बरांची खर्‍या अर्थाने परीक्षा घेणारी ठरणार आहे.

महिला आरक्षणामुळे 44 पैकी तब्बल 28 प्रभागांमध्ये दोन जागांवर महिलांना संधी मिळाल्याने या ठिकाणांहूनप्रतिनिधित्व करणार्‍या मातब्बरांची गोची होणार आहे. आगामी काळात या प्रभागांमध्ये महिला नगरसेविकांचे वर्चस्व राहणार आहे. तीन प्रभागांत अनुसूचित जमातीच्या महिलांसह सर्वसाधारण प्रवर्गातील महिला प्रतिनिधित्व करणार आहे. 14 प्रभागांत सर्वसाधारणच्या तीनपैकी दोन जागांवर महिलांची मक्तेदारी राहणार आहे. 12 प्रभागांत अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला एकत्र काम करणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 34 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा प्रत्येकी एक महिला नगरसेवक निवडून येणार आहे.

दरम्यान, महिला आरक्षणामुळे सातपूर, पंचवटीसह नाशिकरोड परिसरात मोठी उलथापालथ होणार आहे. पंचवटीत अरुण पवार, गणेश गिते, उद्धव निमसे, मच्छिंद्र सानप, जगदीश पाटील, रूची कुंभारकर यांच्यासह सरिता सोनवणे, सुनीता धनगर, पूनम सोनवणे अडचण होण्याची चिन्हे आहेत. नाशिकरोडमध्ये राहुल दिवे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, जगदीश पवार तसेच सिडकोमध्ये राकेश दोंदे, भगवान दोंदे तर सातपूरमध्ये शशिकांत जाधव, सलीम शेख, रवींद्र धिवरे, वर्षा भालेराव, संतोष गायकवाड यांची कोंडी झाली आहे.

असे असणार महिला आरक्षण
अनुसूचित जाती – 12(अ), 14(अ), 22(अ), 26(अ), 27(अ), 34(अ), 35(अ), 41(अ), 43(अ), 44(अ)
अनुसूचित जमाती – 2(अ), 4(अ), 7(ब), 11(ब), 34(ब)
सर्वसाधारण प्रवर्ग – 5(ब), 10(ब), 16(ब), 18(ब), 21(ब), 29(ब), 30(ब), 31(ब), 32(ब), 33(ब), 36(ब), 37(ब).

सोडतीत असे निघाले प्रभागनिहाय आरक्षण…

प्रभाग-1 : अ. अनुसूचित जमाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण खुला, प्रभाग- 2 , अ. अनुसूचित जमाती(महिला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 3 , अ. अनुसूचित जाती ( खुला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 4 , अ. अनुसूचित जमाती (महिला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 5 , अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 6 , अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण, क. सर्वसाधारण, प्रभाग- 7 , अ. अनुसूचित जाती , ब. अनुसूचित जमाती (महिला), क. सर्वसाधारण, प्रभाग- 8 , अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण खुला, ड. सर्वसाधारण खुला, प्रभाग- 9 , अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण क. सर्वसाधारण, प्रभाग-10, अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 11, अ. अनुसूचित जाती , ब. अनुसूचित जमाती (महिला), क. सर्वसाधारण, प्रभाग- 12, अ. अनुसूचित जाती (महिला) , ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 13 , अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण, क. सर्वसाधारण, प्रभाग- 14 , अ. अनुसूचित जाती (महिला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 15 – अ. अनुसूचित जाती , ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 16 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग-17 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण, क. सर्वसाधारण, प्रभाग- 18, अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 19, अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण, क. सर्वसाधारण, प्रभाग- 20, अ. अनुसूचित जाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 21: अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 22 : अ. अनुसूचित जाती (महिला); ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 23 : अ. अनुसूचित जाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 24 : अ. अनुसूचित जाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 25; अ. अनुसूचित जाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 26: अ. अनुसूचित जाती (महिला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 27: अ. अनुसूचित जाती (महिला), ब. अनुसूचित जमाती, क. सर्वसाधारण, प्रभाग-28: अ. अनुसूचित जमाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 29 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग- 30 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 31 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 32 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 33 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 34 : अ. अनुसूचित जाती (महिला), ब. अनुसूचित जमाती (महिला), क. सर्वसाधारण, प्रभाग – 35: अ. अनुसूचित जाती (महिला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 36: अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 37, अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 38 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण, क. सर्वसाधारण, प्रभाग – 39: अ. अनुसूचित जाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 40 : अ. सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण, क. सर्वसाधारण, प्रभाग – 41 : अ. अनुसूचित जाती (महिला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 42: अ. अनुसूचित जाती, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 43 : अ. अनु. जाती( महिला), ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, प्रभाग – 44 : अ. अनुसूचित जाती (महिला), ब. अनुसूचित जमाती, क. सर्वसाधारण.

दिग्गज येणार आमने सामने…
महिला आरक्षण सोडतीनंतर सिडको, इंदिरानगर, पाथर्डी फाटा या परिसरातील दिग्गज नेत्यांमध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग क्र. 30 मध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले आणि शिवसेनेचे बंटी तिदमे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. प्रभाग 34 मध्ये शिवसेनेचे भागवत आरोटे व मधुकर जाधव आमने सामने आले आहेत. तर भाजपच्या राकेश दोंदेंचा पत्ता कट झाला आहे.
प्रभाग 32 मध्ये माजी नगरसेवक श्याम साबळे की, पवन मटाले यांच्यापैकी एकाला उमेदवारी देताना शिवसेनेची कसरत होणार आहे. प्रभाग 39 मध्ये बापू सोनवणे आणि अमोल जाधव आमने सामने येणार आहे. तर प्रभाग 44 मध्ये भगवान दोंदे यांचा पत्ता कट झाला असून, त्यांना कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे.

दरम्यान, आरक्षण सोडतीनंतर प्रभाग 31 मधून शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी नगरसेविका हर्षा बडगुजर सेफझोनमध्ये आले आहेत. तर प्रभाग 33 मध्ये सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर या माजी नगरेसविका आरक्षणामुळे सुरक्षित झाल्या आहेत. तर प्रभाग 36 मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचा मार्ग सुकर झाला आहे.

हरकतींसाठी 6 जूनपर्यंत मुदत
महिला आरक्षण सोडतींवर सूचना अथवा हरकत नोंदविण्यासाठी 6 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सूचना-हरकती मनपा मुख्यालयासह विभागीय कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणी घेऊन 13 जूनला राज्यपत्रात महिलांसाठीच्या राखीव प्रभागाची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सिडकोतही बोलबाला …
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचे लक्ष लागून असणारे प्रभागनिहाय आरक्षण मंगळवारी (दि. 31) जाहीर झाले. यात सिडको विभागात एकूण 10 प्रभागांपैकी 8 प्रभागांत प्रत्येकी दोन महिला आरक्षण जाहीर झाल्याने सिडकोत 18 महिला व 12 पुरुष आरक्षण झाल्याने महिलांचे वर्चस्व राहणार आहे.

नाशिक महापालिकेतर्फे अनुसूचित जाती, जमाती महिला व सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. सिडकोतील प्रभाग क्रमांक 30 ते 37 पर्यंत प्रत्येक प्रभागात दोन महिला आरक्षण, तर प्रभाग क्रमांक 38 मध्ये व प्रभाग क्रमांक 44 मध्ये दोन पुरुष व 1 महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे सिडको विभागात एकूण 10 पैकी 8 प्रभागांत प्रत्येकी दोन महिला आरक्षण जाहीर झाल्याने 18 महिला व 12 पुरुष आरक्षण असेल. या आरक्षणामुळे अंबड येथील भाजपचे माजी नगरसेवक राकेश दोंदे यांना त्यांची पत्नी प्रियंका दोंदे तसेच पाथर्डी गाव येथील भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनाही आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांनीही पत्नी शैला दोंदे यांचा प्रचार सुरू केला आहे.

अश्विननगर येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रकात खाडे यांनी आरक्षणामुळे सिडकोतून थेट प्रभाग क्रमांक 44 पाथर्डी गाव या भागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको भागात सर्वाधिक महिला आरक्षण पडल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला, तर इच्छुक पुरुषांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button