नाशिक : नाशिप्र संस्थेला संपन्न विचारांचा वारसा : डॉ. कलाल | पुढारी

नाशिक : नाशिप्र संस्थेला संपन्न विचारांचा वारसा : डॉ. कलाल

सिडको : पुढारी वृत्तसेवा : नाशिप्र संस्थेच्या संस्थापक सदस्यांच्या विचारांनी संस्था संपन्न वारसा चालवत असल्याचे प्रतिपादन माजी समाजकल्याण उपआयुक्त व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकस्तंभ येथील जु. स. रुंगटा हायस्कूल सभागृहात आयोजित 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून व संस्थेच्या 105 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या यूट्यूब चॅनलच्या उदघाटनाप्रसंगी डॉ. कलाल बोलत होते. व्यासपीठावर सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, जॉइन्ट सेक्रेटरी प्रसाद कुलकर्णी, मयूर कपाटे, मिलिंद कचोळे, विलास पूरकर, मुख्याध्यापिका स्मिता पाठक, मुख्याध्यापिका यशश्री कसरेकर, सुचेता कुकडे, अविनाश कुलकर्णी, मीनल बर्वे आदी उपस्थित होते.
स्मिता पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. कलाल यांच्या हस्ते नाशिप्र मंडळाच्या एनएसपीएम यूट्यूब चॅनलचे उद्घाटन संपन्न झाले. मुकुंद बागूल यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. ’ज्ञानयात्री’ त्रैमासिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वाती जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button