नाशिक : जिल्ह्यात आयुष्मान आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात आयुष्मान आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमाचा एक भाग म्हणून आयुष्मान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानुसार 18 ते 22 एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी ना. डॉ. पवार म्हणाल्या की, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी त्याचप्रमाणे हेल्थ आयडी, पीएमजेएवाय कार्ड तयार करणे, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत कराव्यात व या सुविधा नागरिकांना देण्यास केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button