अमरावती : भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांना अटक | पुढारी

अमरावती : भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप शहराध्यक्ष अभय माथने यांना अटक करण्यात आली आहे. झेंडा काढण्याच्या वादातून अचलपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर अचलपूरचे भाजप शहराध्यक्ष अभय माथने यांना अटक करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढण्याच्या वादवारून दोन गटात हिंसाचार झाला होता. त्यानंतर मुख्य आरोपी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

अभय मातने यांनी हा झेंडा लावला असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हा वाद चिघळला आहे. दरम्यान पोलिसांकडून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता. शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Back to top button