जळगाव : डीपीला कंटेनर धडकून विजेच्या धक्‍क्‍याने चालकाचा मृत्‍यू | पुढारी

जळगाव : डीपीला कंटेनर धडकून विजेच्या धक्‍क्‍याने चालकाचा मृत्‍यू

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा : कंटेनर रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने डीपीला कंटेनर धडकून विजेच्या धक्क्याने चालकाचा मृत्यू झाल्‍याची दुर्देवी घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला आरजे ०९ जीसी २५९७ या क्रमांकाचा कंटेनर लावण्यात आला होता. हा कंटेनर बाहेर काढत होता. यावेळी चालकाने गाडी रिव्हर्समध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. यामुळे कंटेनर सरळ डीपीवर आदळला. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर परिसरातील लोकांनी घाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह बाहेर काढला. ही घटना आज (शनिवार) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. संबंधीत चालकाचा मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविण्यात आला आहे.

Back to top button