नाशिक : महावितरणच्या कार्यालयाला आडगावकरांनी ठोकले टाळे | पुढारी

नाशिक : महावितरणच्या कार्यालयाला आडगावकरांनी ठोकले टाळे

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठ दिवसांपासून आडगावमध्ये लोडशेडिंग सुरू असल्यामुळे संतप्त झालेल्या आडगावकरांनी मंगळवारी (दि.12) सकाळी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी गाव अंधारात असल्यामुळे संपूर्ण महावितरणविरोधात जोरदार संताप व्यक्त करण्यात आला.

आडगावमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महावितरणने लोडशेडिंग सुरू केले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णता आणि डासांचे प्रमाणही वाढले आहे. मंगळवारी सकाळी सर्व नागरिक गावातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर जमा झाले. येथील अधिकार्‍यांना धारेवर धरत सर्वांनी जाब विचारला. या आंदोलनात माजी नगरसेविका शीतल माळोदे, अ‍ॅड. नितीन माळोदे, बालाजी माळोदे, एकनाथ मते, संतोष भोर, युवराज झोमान, कैलास शिंदे, विशाल शिंदे, उमेश माळोदे, दौलत शिंदे, भाऊ शिंदे, प्रभाकर माळोदे आदी शेतकरी व महिला सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button