Megi Storm: फिलिपाईन्सला 'मेगी' चक्रीवादळाचा तडाखा; ५८ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिलिपाईन्स येथे रविवारी मेगी चक्रीवादळामुळे (Megi Storm) आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात भूसख्खलन झाले. यामध्ये ५८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. फिलिपाईन्स या देशात वर्षाला साधारणपणे २० हून अधिक अशी वादळे धडकतात.
Megi Storm : बेबे शहरासह अनेक गावांना फटका
मेगी वादळ ताशी ६५ किलोमीटर वेगाने येऊन आग्नेय आशियाई द्विपसमुहाला धडक दिली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लेयटे प्रांतातील बेबे शहराला आणि आसपासच्या अनेक गावांना सर्वाधिक फटका बसला. मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे ५० लोकांचा मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले असून, २६ बेपत्ता आहेत.
मेगी वादळामुळे अनेक गावांमध्ये भूसख्खन झाले. नागरिक चिखलात अडकले. १० गावांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. आठवड्याच्या शेवटी मध्य आणि दक्षिण प्रांतातील विविध भागात आलेल्या पुरामुळे सुमारे 30,000 कुटुंबांना स्थलांतर करावे लागले आहे, असे स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे. आग्नेय आशियाईतील हे राष्ट्र पॅसिफिक ‘रिंग ऑफ फायर’ वर वसले आहे. येथे वारंवार अनेक ज्वालामुखी उद्रेक आणि भूकंप होतात.
Death toll from Philippine landslides, floods rises to 58, as per official tallies: AFP
— ANI (@ANI) April 13, 2022
हे वाचलंत का?
- नाशिक : तीन हजार पुस्तके वापरत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती
- नाशिक : शंभर दिवसांत तीन कोटी रुपयांवर डल्ला ; पोलिसांसमोर आव्हान
- कर्नाटक : दोन दिवसांचे अर्भक रस्त्यावर; निष्ठुर जन्मदात्यांकडून माणुसकीला काळिमा फासणारी घटना
- रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण : चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आता मला अडकवण्याचा प्रयत्न’