सातारा : कोरेगाव मतदारसंघातील ग्रामपंचायत इमारतींसाठी 75 लाख ; आ. महेश शिंदे

सातारा : कोरेगाव मतदारसंघातील ग्रामपंचायत इमारतींसाठी 75 लाख ; आ. महेश शिंदे

सातारा : पुढारी वृत्तसेवा
कोरेगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या इमारतींची दूरवस्था शासनाच्या निदर्शनास आली होती. ग्रामपंचायत कार्यालयांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सातारा तालुक्यातील तासगाव आणि कोरेगाव तालुक्यातील चंचळी, जांब खुर्द, बर्गेवाडी व रेवडी या ग्रामपंचायत इमारतींसाठी प्रत्येकी 15 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. महेश शिंदे यांनी दिली.

कोरेगाव मतदारसंघातील सर्वसामान्यांचा विकास करायवाचा असल्यास ग्रामपंचायती सक्षम होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतींचा आर्थिक स्तर आणि इमारत सुस्थितीत असणे आवश्यक आहे. गावोगावच्या दौर्‍यामध्ये ग्रामपंचायतींना भेटी दिल्या असता तेथील चित्र विदारक होते. इमारती नादुरुस्त असणे, जुन्या इमारतींची वेळीच डागडूजी न होणे, इमारती अपुर्‍या असणे अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

ग्रामपंचायत इमारतींचे सर्वेक्षण करण्याबाबत राज्य शासनाला पत्र देणार : महेश शिंदे

कोरेगाव विधानसभा मतदार संघातील खेडोपाडी असलेल्या ग्रामपंचायतींच्या इमारतींचे तात्काळ सर्वेक्षण करण्याबाबत राज्य शासनाला पत्र देणार असून नजीकच्या काळात टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र टुमदार इमारत करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतींचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार असल्याचेही आ. महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news