जळगाव : एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला | पुढारी

जळगाव : एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

जळगाव पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जळके गावातील बसस्थानकाजवळ स्टेट बँकेचे एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून मशिन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आज सकाळी उघडकीला आले. मात्र चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला. त्यांना रिकाम्या हाती जावे लागले.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके गावातील वावडदा रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीमएम आहे. शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास या एटीएम मशिनच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी एटीएममध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, चोरट्यांकडून एटीएम मशिन न फुटल्याने मशिनमधील कॅश सुरक्षीत राहिली. आज सकाळी स्टेट बँकेचे व्यवस्थापक दीपक तिवारी यांनी एटीएमची पाहणी केली. यावेळी त्यांनी एटीएम मशिनचे कुठलेही नुकसान झाले नसल्याने तक्रार देणार नसल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button