रमेश पवार नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त | पुढारी

रमेश पवार नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त

नाशिक पुढारी ऑनलाइन : 

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार यांची बदली करण्यात आली आहे. पवार हे सध्या मुंबई महापालिकेत सहआयुक्त आहेत. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार पवार यांनी तत्काळ स्विकारावा असे आदेश उप-सचिव प्रियंका कुलकर्णी यांनी काढले आहेत.

नाशिकमधील 7 हजार सदनिकांच्या संभाव्य घोटाळ्याचे प्रकरण कैलास जाधव यांना भोवले असून त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश  विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वरून आयुक्तांवर आर्थिक दुर्बल घटकातील 20 टक्के घर म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button