नाशिक : पेठ तालुक्यातील हरणगावात दोन एकर ऊस जळून खाक | पुढारी

नाशिक : पेठ तालुक्यातील हरणगावात दोन एकर ऊस जळून खाक

पेठ, पुढारी वृत्तसेवा : पेठ तालुक्यातील हरणगाव येथील शेताच्या बांधालगत असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या डीपीवर नेहमी शॉर्ट सर्किट होत असते. याबाबतची तक्रार वारंवार करूनही वेळीच दखल न घेतल्‍याने आज या परिसरात आग लागली. या आगीत शेतातील दोन एकर ऊस जळून खाक झाला. त्‍यामूळे शेतकरी हवाल दिल झाला आहे.

हरणगाव येथील शेतकरी सुरेश राऊत यांच्या शेताच्या बांधालगत वीजेची डीपी आहे. त्या ठिकाणी नेहमी शॉर्ट सर्किट होत होते. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या परिसरात अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही दोन एकर क्षेत्रातील ऊस जळाला.

हे सर्व डोळ्यासमोर पाहून शेतकरी हवालदिल झाले. महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे सदर आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता या शेतक-याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button