परभणी : ताडकळसमध्ये वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून खून

Murder: file photo
Murder: file photo
Published on
Updated on

ताडकळस (जि.परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : परभणी येथील ताडकळसमध्ये वृद्ध दाम्पत्याचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केला. यामध्ये आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सदर प्रकार हा बुधवारी सकाळी उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या घटनेची माहीती मिळताच उप विभागिय पोलीस अधिकारी व ताडकळस पोलीस ठाण्याचे एपीआय व कर्मचारी यांनी तत्‍काळ घटनास्थळाला भेट दिली. त्‍यानंतर पंचनामा केला. शंकराव रिषे (वय 70) व त्यांच्या पत्नी सारजाबाई रिषे (वय 60) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

दरम्‍यान, मंगळवारी मयत सारजाबाई यांची बहीण गिरजाबाई गोंविद आडकिने एका 30 ते 35 वयाच्या तरुणासोबत बहिणीकडे भेटण्यासाठी गेल्‍या होत्‍या. रात्री जेवण करुन रिषे दाम्पत्य व त्यांची बहीण व त्याच्यासोबत आलेला तरुणही तेथेच झोपला. बुधवारी सकाळी घरातील कोणीच उठले नसल्याचे शेजा-यांच्या लक्षात आले. त्‍यानंतर शेजाऱ्याने घरात जावून पाहिले असता सारजाबाई रिषे व शंकरराव रिषे हे दोघेही रक्ताबंबाळ अवस्थेत तर गिरजाबाई अडकिने या जखमी अवस्थेत दिसून आल्या.

त्‍यानंतर तत्‍काळ यांची माहीती ताडकळस पोलिस स्टेशनला नागरीकांनी दिली. माहीती मिळताच पोलीस घटनास्‍थही दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या गिरजाबाईला अडकिने यांना परभणी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान घटनेचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. गिरजाबाई आडकिणे यांच्यासोबत आलेला तरुण घटनास्थळावरून पसार झाल्याने गावात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news