एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार मायक्रोबायोलॉजी ची परीक्षा | पुढारी

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार मायक्रोबायोलॉजी ची परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोेग्य विज्ञान विद्यापीठातर्फे हिवाळी-2021 परिक्षेतील एमबीबीएस (2019) द्वितीय वर्षाचा 11 मार्च रोजी घेण्यात आलेला मायक्रोबायोलॉजी-1 चा पेपर रद्द करण्यात आला आहे. रद्द झालेला हा पेपर येत्या 26 तारखेला सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळेत घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परिक्षा 28 तारखेपासून सुरू होईल, अशी माहिती विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली.

राज्यातील 41 केंद्रांवर शुक्रवारी (दि.11) मायक्रोबायोलॉजी-1 चा परिक्षा पार पडली. परंतु, लातूर मध्ये कॉपी झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. यासर्व पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने या विषयाची पुर्नपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार एमबीबीएस (2019) या अभ्यासक्रमाचा मायक्रोबायोलॉजी-1 हा पेपर येत्या 26 तारखेला सकाळी 10.30 ते दुपारी दीड यावेळेत हा पेपर होणार आहे. मात्र, एमबीबीएसचा जुन्या अभ्यासक्रम असलेल्या (विषय क्रमांक 01203ए) यांची सदर विषयाची लेखी परिक्षा घेण्यात येणार नसल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.

विद्यापीठाच्या वेळापत्रकानूसार एमबीबीएसच्या दिवतीय वर्षाच्या सर्व विषयांच्या प्रात्यक्षिक परिक्षा 21 मार्चपासून घेण्यात येणार होत्या. मात्र, त्याच्याही वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या परिक्षा आता 28 मार्चपासून होणार आहेत. दरम्यान, मायक्रोबायोलॉजी-1 ची पुर्नपरिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीत देण्यात आलेल्या हॉल तिकिटावरच त्यांनी यापूर्वी पेपर दिलेल्या परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. तसेच 11 मार्चला झालेल्या परिक्षेस काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना 26 तारखेचा परिक्षेला बसण्याची मुभा देण्यात आल्याचे परिक्षा नियंत्रक पाठक यांनी कळविले आहे.

Back to top button