नाशिक : फेसबुकवरील मैत्री पडली महागात, अश्लील व्हिडिओ काढून केली पैशांची मागणी | पुढारी

नाशिक : फेसबुकवरील मैत्री पडली महागात, अश्लील व्हिडिओ काढून केली पैशांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : फेसबुकवर मैत्री करताना प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातून चुकीचा प्रकार घडू शकतो. सायबर पोलिस ठाण्यात असाच एक प्रकार दाखल झाला असून, फेसबुकवरील मैत्रीतून अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी एका व्यक्तीला फेसबुकवर पूनम शर्मा नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. पुढे दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. पूनम शर्मा या अकाउंटवरून संबंधित व्यक्तीचा व्हॉट्सॲप क्रमांक मागितला गेला. त्यानंतर ८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एक व्हिडिओ कॉल आला. त्यामध्ये एक महिला विवस्त्र अवस्थेत बसून अश्लील हावभाव करीत होती. याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ काढण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला गुगल पेवर पैसे पाठव अन्यथा फेसबुकवरील तुझ्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ पाठविला जाईल, अशी धमकी देण्यात आली. दरम्यान, संबंधित व्यक्तीने या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button