

नाशिक : (ञ्यंबकेश्वर) पुढारी वृत्तसेवा ; गंगाथरन डी यांनी नाशिक जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्विकारताच आज शुक्रवार (दि.11) त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. पुजा व अभिषेक केला. जिल्ह्यात शांतता व सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांचे पौरोहित्य पंकज व पराग धारणे यांनी केले. जिल्हाधिकारी यांचे समवेत प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, मंडल अधिकारी अनिल रोकडे आदी उपस्थित होते.
मंदिर प्रांगणात आल्या नंतर पंकज धारणे यांच्याकडून त्यांनी ञ्यंबकेश्वर मंदिर येथील व्यवस्थापन, सोयी सुविधा यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. येथे दररोज येणारे भाविक, त्यांना उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा याबाबत देखील त्यांनी विचारणा केली. उपस्थित महसुल अधिका-यांनी त्यांना ञ्यंबकेश्वर शहर आणि परिसराबाबत सविस्तर माहिती दिली. गोदावरीच्या उगमस्थानाबाबत त्यांनी माहिती घेतली.