पुढारी ऑनलाईन डेस्क : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) 2022 च्या पहिल्या 2 महिन्यांत आपल्या 4 कार लॉन्च केल्या आहेत. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी अशी ओळख असणाऱ्या मारुती सुझिकी देशातील हॅचबॅक कार (Hatchback car) ग्राहकांमध्ये मध्ये खूप लोकप्रिय आहे. आता या कंपनीची नजर एसयूव्ही (SUV) सेगमेंटवर आहे.
अलीकडेच, कंपनीने नवीन Baleno, WagonR, Celerio आणि Diazer च्या CNG मॉडेल्स लॅान्च केली आहेत. कंपनी आता त्यांच्या नवीन 6 कार वर काम करत आहे, ज्यामध्ये सध्याच्या मॉडेलच्या CNG आवृत्तीसह नवीन कारचा समावेश असेल. त्यामुळे तुम्ही जर मारुतीच्या आगामी कारची वाट पाहत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण तपशील घेऊन आलो आहोत
ही कार एप्रिल 2022 मध्ये लॉन्च होऊ शकते. नवीन मारुती ब्रेझा (Brezza) एक मोठ्या केबिनसह, आकर्षक डिझाइनमध्ये पहायला मिळेल. इलेक्ट्रिक सनरूफ, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टेल-लाइट्ससह या नव्या कारमध्ये असेल.
वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक, नवीन सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, हवामान नियंत्रण, अशा सर्व-नवीन इंटीरियरसह पहायला मिळेल.
मारुती सुझिकीची जिमनी (Jimny) एसयूव्हीच्या लाँग व्हीलबेस (LWB) मॅाडेलमध्ये असेल. हे नवीन मॉडेल प्रामुख्याने भारतीय बाजारपेठेवर लक्ष्य केंद्रीत करेल. तसेच ही कार काही निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील लॉन्च करण्याचे नियोजीत आहे.
हे मॉडेल 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या असणाऱ्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये असेल. या एसयूव्ही मॅाडेल मध्ये 4WD (four-wheel-drive) ही प्रणाली मिळण्याची शक्यता आहे. तसेच मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ही कार पहायला मिळेल. त्याचबरोबर मारुती सुझिकी जिमनी ही कार नवीन पिढीची मारुती जिप्सी म्हणून पुन्हा एका नव्या ब्रँडची ओळख निर्माण करेल. मारूती जिमनी (Maruti Jimny) 2020 ऑटो एक्सपोमध्ये पदार्पण केलेल्या जिमनी सिएरावर आधारित असेल.
कंपनी एका नवीन मारूती मध्यम आकाराच्या (मिड साइज )SUV वर काम करत आहे. या कारचे कोडनेम YFG असे आहे. ही कार 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. हाे नवीन मॉडेल सुझिकी आणि टोयोटा यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. टोयोटाची हायब्रीड प्रणाली नवीन मारुती YFG मिड साइजच्या एसयूव्हीमध्ये देखील वापरली जाईल. सुझुकीच्या या मिड साइजच्या एसयूव्हीचे नाव विटारा असू शकते अशी प्राथमिक माहिती आहे.
कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी COUPE SUV ही कार तयार करत आहे, ज्याचे कोडनेम YTB आहे. याची विक्री Brezza SUV सोबत केली जाईल. नवीन मारुती YTB Coupe SUV नेक्सा प्रीमियम डीलरशिप नेटवर्कद्वारे विकली जाईल.
मारुती या वर्षी नवीन जनरेशन अल्टो हॅचबॅक कार लॅान्च करण्याचा विचार करत आहे, जे S-Presso, नवीन Celerio आणि WagonR ला कमी वजनाच्या HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन मारुती अल्टो 2022 च्या आकारात वाढ केल्याची शक्यता आहे. कारण ती याआधीच्या मॉडेलपेक्षा उंच, रुंद आणि उंच दिसत आहे.
ही कार कंपनीची सर्वात लोकप्रिय Ertiga या कारपैकी एक 7 सीटर Ertiga कार आहे. नवीन Ertiga ही आकर्षक डिझाइन मध्ये पहायला मिळेल. यामध्ये हेडलॅम्प, बंपर, अलॉय व्हील आणि टेललॅम्पसह नवीन फ्रंट ग्रिलचा समावेश असेल. की कंपनी जूनच्या आधी ही कार लॉन्च करू शकते, ज्यामध्ये सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह समान 1.5L पेट्रोल इंजिन वापरण्यात येईल.
हेही वाचा