ये तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है च्या जय घोषात जळगावात विजयोत्‍सव | पुढारी

ये तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है च्या जय घोषात जळगावात विजयोत्‍सव

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा ये तो अभी झाकी है, महाराष्ट्र बाकी है, जय श्रीराम या घोषणा देत आज (गुरूवार) दुपारी जळगावात भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड व पंजाब राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चार राज्यात बहुमत मिळाले. याबद्दल जळगाव, भुसावळ, जामनेर मध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून पेढे वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

भाजपाला चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळाल्याने जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जळगावात बीजेपी कार्यालयाजवळ ढोल-ताशांच्या गजरामध्ये गुलाल उधळून आनंदोत्‍सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

येतो झाकी है, अभी तो महाराष्ट्र बाकी है, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या, तर जामनेर येथे नगरपालिका चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भुसावळ येथे लाडूचे वाटप करत ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करण्यात आला.

Back to top button