Cylinder explosion : जळगाव : सिलिंडरच्या स्फोटात एक ठार, एक जखमी | पुढारी

Cylinder explosion : जळगाव : सिलिंडरच्या स्फोटात एक ठार, एक जखमी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जानकीनगर येथे झालेल्या गॅस सिलिंडरच्या (Cylinder explosion) स्फोटात एक जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (मंगळवार) सायंकाळी घडली. यात स्वयंपाक करत असलेले बन्सीलाल पांडे ( वय ५५ ) जागीच ठार झाले. तर बालकिशन गणेशलाल जोशी हे गंभीर जखमी झाले. जळगाव महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

जानकीनगर येथे बंसीलाल पांडे केटरिंग वाले यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder explosion) झाला. जखमीला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेची माहिती कळताच महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच घटनास्थळी एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस नाईक मुदस्सर काजी, किशोर पाटील दाखल झाले आहेत.
दरम्यान, घटनास्थळावर आठ ते दहा सिलिंडर आढळून आले. अग्निशामक दल व नागरिकांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठी हानी टळली.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : गो ग्रोमोअर सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड देतंय शेअर मार्केटच्या माध्यमातून

Back to top button