नांदेड : महिला दिनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक गजाआड | पुढारी

नांदेड : महिला दिनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक गजाआड

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जगभरात आज महिला दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. मात्र नांदेडमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका खासगी कोचिंग क्‍लासेसच्या संचालकाने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. पोलिसांनी तात्‍काळ याबात चाौकशी करून आराेपीस अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आईने आपल्‍या मुलीचा विनयभंग झाल्‍याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्‍यानुसार, त्यांची अल्पवयीन मुलगी यशनगरी येथे असलेल्या आयडीयल इन्स्टिट्यूट सायन्स अ‍ॅण्ड मॅथमॅटिक्स या कोचिंग क्‍लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होती. क्‍लासेसचा संचालक सतीश नरंगळे याने या मुलीच्या जवळ गेला. तसेच जवळीक साधत तिच्या कानात ‘मी तुला आवडतो का?’ असे म्हणत विनयभंग केला.

या तक्रारीवरून नरगंळे याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी याबाबत आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भोसले करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button