नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार | पुढारी

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नाशिक  : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबक रोडवरील वासाळी शिवारातील चंद्रभागा लॉन्ससमोर बुधवारी (दि.2) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना घडली.

शहरालगतच्या मळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे. बुधवारी रात्री त्र्यंबक रोडवरील वासाळी परिसरात बिबट्या संचार करत असताना, अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्यास पशु रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. बिबट्या नरजातीचा असून, दोन ते तीन वर्षाचा असावा. वनविभागाने पंचनामा करून पशुधन विकास अधिकारी श्रीमती थोरात, वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वननिरीक्षक अधिकारी ओमकार देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button