Sakri : मलांजन ग्रामपंचायतीवर महिला राज ; सरपंचपदी शीतल सोनवणे | पुढारी

Sakri : मलांजन ग्रामपंचायतीवर महिला राज ; सरपंचपदी शीतल सोनवणे

पिंपळनेर ( जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा
साक्री (Sakri) तालुक्यातील मलांजन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीतल परीक्षित सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मलांजन ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यु. के. पावरा यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक निकम उपस्थित होत्या. प्रसंगी निर्धारित मुदतीत शीतल सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पावरा यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पानपाटील, उमेश सोनवणे, ज्योती सोनवणे, ऊर्मिला सोनवणे, सुरेश पवार, रेखा बहिरम आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सोनवणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी शीतल सोनवणे यांचे अभिनंदन करत सत्कार केला. यावेळी दीपक सोनवणे व कांतिलाल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे अभिनंदन केले व नवनियुक्त सरपंचांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

Back to top button