नाशिकमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

नाशिकमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. पहिल्या घटनेत ललीता उमेश ठाकरे (३०, रा. वैभव कॉलनी, राजीवनगर) यांनी बुधवारी (दि.२३) राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत अमर रामदास महाले (३०, रा. शांतीनगर, मखमलाबाद रोड) याने बुधवारी सायंकाळी दादोजी काेंडदेव नगर येथील कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button