नाशिक : सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना भरावा लागणार कर | पुढारी

नाशिक : सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना भरावा लागणार कर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिमधील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आता कर लावण्यात आला आहे. यामध्ये खासगी वाहनातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जास्‍त कर लावण्यात येणार आहे. या प्रस्‍तावाला जिल्‍हा परिषद स्‍थायी समितीच्या सभेत मंजूरी देण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हा प्रस्‍ताव कोणी मांडला आणि कोणी पारित केला याबाबत माहिती मिळालेली नाही.

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर लाखो भाविक येत असतात. भाविकांना विविध सुविधा देणे हे ग्रामपंचायतीसमोर मोठे आर्थिक संकट राहते. त्‍यामुळे याआधी भाविकांच्या वाहनांवर कर आकरण्याची मागणी याआधी केली होती. तसेच याची चर्चाही स्‍थायी समितीमध्ये झाली होती. यानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दरडोई पाच रुपये कर लावण्यात यावा याबाबत मंजुरी दिली आहे.

कसा असेल कर

एखाद्या वाहनातून 5 जण असतील तर प्रत्‍येकी 5 रूपये असा 25 रूपये असा कर असेल. आता या निर्णयाला विरोध होत असून हा विरोध वाढण्याची शक्‍यता आहे.

हे ही वाचा  

Back to top button