नाशिक : हद्दपार का करण्यात येऊ नये? दीपक दातीर यांच्यासह ‘त्या’ चौघांना कारणे दाखवा नोटीस | पुढारी

नाशिक : हद्दपार का करण्यात येऊ नये? दीपक दातीर यांच्यासह 'त्या' चौघांना कारणे दाखवा नोटीस

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना नगरसेवक दिपक दातीर, बाळा दराडे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करुन तोडफोड केली होती. त्या प्रकरणात दीपक दातीर, बाळा दराडे, किशोर साळवे, योगेश चुंबळे, नितीन सामोरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 प्रमाणे या पाचही जणांना हद्दपार करण्याची शिफारस पोलिस उप-आयुक्त यांच्याकडे का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशी अधिकारी तथा सहा.पोलिस आयुक्त दिपाली खन्ना यांनी ही नोटीस बजावली आहे.

या हद्दपारीच्या चौकशीसाठी (दि. 9) फेब्रुवारी सकाळी 11 वाजता सहा पोलिस आयुक्त (विभाग-2) शरणपूर रोड येथील कार्यालयात हजर राहावे असे नोटीसीत बजावण्यात आले आहे. तुम्हाला तुमच्या बचावासाठी कुणी साक्षीदार हजर करावयाचे असतील तर अशा साक्षीदारांना तपासणी करिता आमच्या समक्ष हजर करु शकता. तुम्ही तुमचे लेखी निवेदन सादर केल्यास सहानूभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असे दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button