नाशिक : जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे सुरू होणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे सुरू होणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; राज्यात सोमवार (दि.२४) पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शासकीय तसेच अनुदानित वसतीगृहे सुरू करण्याचे परिपत्रक काढले आहे.

महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत. तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

दरम्यान, अनेक ठिकाणी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन स्थानिक प्राधिकरणाच्या स्थानिक नियमावलीला अनुसरून वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button