जळगाव : विवाहितेचा ५ लाखांसाठी छळ; पतीसह सासूवर गुन्हा दाखल | पुढारी

जळगाव : विवाहितेचा ५ लाखांसाठी छळ; पतीसह सासूवर गुन्हा दाखल

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा

घर घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्यासाठी पतीसह सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पतीसह सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रिता अनिकेत पवार (वय २८, रा. तुलसी विहार पनवेलकर, रॉयल कोर्स, बदलापूर मुंबई ह. मु. म्हसावद तालुका जि. जळगाव) यांचा विवाह अनिकेत नितीन पवार (रा. बदलापूर मुंबई) यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती अनिकेत पवार यांनी पत्‍नी रिता पवार यांच्याकडून घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत या कारणासाठी शिवीगाळ करणे, मारहाण करून छळ सुरू केला.

यासाठी सासू लताबाई नितीन पवार यांनी देखील मुलाचे कान भरवून विवाहिता रिता पवार यांचा छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी शिरसोली येथे निघून आल्या.

त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांत शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी पती अनिकेत नितीन पवार आणि सासू लताबाई नितीन पवार यांच्याविरोधात शारीरिक छळ व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहेत.

Back to top button