Nashik Rain : पिंपळनेरसह परिसरासह आदिवासी पश्चिम पट्ट्यात संततधार पाऊस | पुढारी

Nashik Rain : पिंपळनेरसह परिसरासह आदिवासी पश्चिम पट्ट्यात संततधार पाऊस

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेरसह परिसरातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस सुरु आहे. पिंपळनेर चरणमाळ नवापूर रस्त्यावरील प्रतापपूर गावाजवळच्या फरशी पुलाचे काम सुरु होते. त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून फरशी पुलाच्या बाजूने वाहतुकीसाठी सुरू होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून साक्री तालुक्यासह पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टीमुळे रस्त्याची माती भराव वाहुन गेल्यामुळे नवापूर ते चरणमाळ (पिंपळनेर मार्गे) रस्ता बंद करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कोसळलेली झाडे सुमारे २० वर्षांपूर्वीचे एक डेरेदार वृक्ष आहे. संततधार पावसामुळे येथील बोरबन भिलाटी जवळील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळा आवारात असलेले एक जीर्ण वृक्ष दुपारी तीन वाजताच्या सुमारास पडल्याने दोन वर्गखोल्यांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने शाळा सकाळच्या सत्रात भरल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

पिंपळनेर येथे गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरुच आहे. पावसामुळे शाळेच्या आवारात पाण्याचे तळे साचले आहे. जमिनीत ओलावा झाल्याने, परिसरात असलेले निलगिरीचे झाड दोन वर्गखोल्यांवर पडले. झाड पडल्याने दोन वर्गखोल्यांचे तसेच स्वयंपाक गृहाचे काही प्रमाणात नुकसान झाले.

जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी सात ते बारा या वेळात भरत असल्यामुळे शाळेला दुपारी सुट्टी असते. त्यामुळे झाडे कोसळली त्यावेळी शाळेच्या आवारात कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या पावसाचे दिवस सुरु असून वादळामुळे झाडे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शाळा परिसरासह गावात असलेली जीर्ण झाडे तोडण्यात यावीत,अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

Back to top button